प्रत्येक मूल प्रगत होऊ शकते?

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

कुसुमाग्रज

                                                     कुसुमाग्रज

वि.वा. शिरवाडकरजन्म नाववि.वा. शिरवाडकरजन्म२७ फेब्रुवारी, १९१२मृत्यू१० मार्च, १९९९राष्ट्रीयत्वभारतीय कार्यक्षेत्रसाहित्य, कवीवडीलवामन शिरवाडकरपुरस्कारज्ञानपीठ पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे त्यांचे वर्णन करतात.वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

अनुक्रमणिका

जीवनसाहित्यकविता संग्रहनिबंध संग्रहनाटककथासंग्रहकादंबरीआठवणीपरलेखनशैलीसाहित्यविचारआविर्भावअनुभवकाव्याविषयीचा दृष्टिकोन(रूपरेषा, पृ.५)नाटक आणि संगीत नाटकदुर्बोधता आणि अलिप्ततासाहित्य आणि सामाजिकतासामाजिकता हेच आजचे परतत्त्वबांधिलकी आणि सामिलकीसाहित्याचे सामाजिक प्रयोजनसाहित्य, नीती आणि अश्लीलतासंदर्भ ग्रंथपुरस्कारवि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मानकुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कारसंदर्भबाह्य दुवे

जीवन

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. शिरवाडकरांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग,धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.

पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांनी नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.

१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.

वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.

साहित्य

कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कविता संग्रहअक्षरबाग (१९९९)किनारा(१९५२)चाफा(१९९८)छंदोमयी (१९८२)जाईचा कुंज (१९३६)जीवन लहरी(१९३३)थांब सहेली (२००२)पांथेय (१९८९)प्रवासी पक्षी (१९८९)मराठी माती (१९६०)महावृक्ष (१९९७)माधवी(१९९४)मारवा (१९९९)मुक्तायन (१९८४)मेघदूत(१९५६)रसयात्रा (१९६९)वादळ वेल (१९६९)विशाखा (१९४२)श्रावण (१९८५)समिधा ( १९४७)स्वगत(१९६२)हिमरेषा(१९६४)निबंध संग्रहआहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रहप्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रहनाटकऑथेल्लोआनंदआमचं नाव बाबुरावएक होती वाघीणकौंतेयजेथे चंद्र उगवत नाहीदिवाणी दावादुसरा पेशवादूरचे दिवेदेवाचे घरनटसम्राटनाटक बसते आहेबेकेटमुख्यमंत्रीययाति देवयानीराजमुकुटविदूषकवीज म्हणाली धरतीलावैजयंतीकथासंग्रहअपॉईंटमेंट (कथासंग्रह)काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)फुलवाली (कथासंग्रह)बारा निवडक कथा (कथासंग्रह)सतारीचे बोल (कथासंग्रह)कादंबरीकल्पनेच्या तीरावर (कादंबरी)जान्हवी (कादंबरी)वैष्णव (कादंबरी)आठवणीपरवाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)लेखनशैली

सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कवितांबरोबरच त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. याशिवाय कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले.

साहित्यविचार

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार अशाप्रकारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंतांच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज, अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा