प्रत्येक मूल प्रगत होऊ शकते?

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रिय विज्ञान दिन विशेष

चंद्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१, १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.

जीवन

रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनीकोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.

संशोधन

त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.

सन्मान

चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.[१]

सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
१. डॉ. आदित्य अभ्यंकर (वैद्यकीय तंत्रज्ञान)
२. कुरियन अरिंबूर (ऑटोमोबाईल)
३. राजेंद्र चोडणकर (नॅनो तंत्रज्ञान)
४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन) ॑॑

संदर्भ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा